top of page

Meditation has the potential to change one's mindset. We at Premgandha meditation follow "active meditation technique". With our Gurudev's guidance and the inner wisdom obtained from the Sadhanas , our Sadhakas have written many insightful songs , poems and articles.
Our Gurudev himself has written a poem called , "Mann suddha asach asta". Gurudev believes in easy and straightforward preaching of thoughts. This belief of Gurudev strongly reflects in this beautifully written poem.
Our Premgandha family's poet Rashmi Tai has very beautifully written and composed Premgandha's prayer. It is written with such devotion that this one song is enough to get to know the principles on which Premgandha is built.
    Maa Videhi ji herself is a brilliant writer. She has written very insightful articles on the intense and deep topics like , "God's existence , Consciousness- a boon " and many more.
    In this way many Sadhaks have come together to form the Premgandha literature which we are highlightling further for you


प्रेमगंध प्रार्थना

सारे विश्व तूच रे
दे आम्हास दर्शन रे
डोळे मिटुनी अंतर्मुख होऊ
ज्योत अंतरिची पाहू ।।१।।

भरभरूनी दिलेस आम्हां
आजन्म तुझा ऋणी असे
मोक्ष मिळू दे याच जीवनी
प्रार्थना ही  करीतसे ।।२।।

मोह माया पिडीत आम्ही
दु:ख वेदनेने ग्रासलो
मी पणात अडकुनी पडलो
चिंतेने मग जखडलो ।।3।।

क्षमा मागितो मनापासूनी
भेटेन तुज पूर्ण निष्ठेनी
साधनेचा मार्ग दिलास आम्हां
सातत्य त्यामध्ये दे सदा।।४।।

श्वास घेऊ जागविण्या शक्ती
तेव्हाच लाभेल आम्हां मुक्ती
सेवेतही कधी नसावा स्वार्थ
तेव्हाच हाक पोहोचेल आर्त।।५।।

चिंतन घडो सदोदीत चित्ती
पार होईल हतबलता भिती
लाभो शांती समाधान
आणि साक्षी भाव निरंतर ।।६।।

समर्पणाचा भाव येवो
होण्या आत्मउन्नत्ती
चैतन्यमय सारे होवो
मग आनंदाची अनुभूती ।।७।।

आशिष दे आम्हावरी
मनोकामना पूर्ण करी
एकरूप होईन मी
प्रेमरूप होईन मी ।।८।।

प्रेमगंधचा असे ध्यास हा
प्रेमगंधचा विश्वास हा
फुलू दे सारा प्रेमगंध
पसरू दे सारा प्रेमगंध ।।९।।


मन

मन सुधा असंच असतं , मन सुधा असंच असतं ||धृ||

एकटं असल्यावर गर्दीत असतं, गर्दीत असल्यावर एकटं असतं...

घरात असलं की घरात नसतं, बाहेर असताना घरात असतं...

गाडीत असलं तर चालत असतं, चालत असलं की गाडीत असतं...

सुखात असल्यावर दुःखात असतं, दुःखात असल्यावर सुखात असतं...

उन्हात असल्यावर सावलीत असतं, सावलीत असल्यावर उन्हात असतं...

गोड असल्यावर तिखट असतं , तिखट असल्यावर गोड असतं...

झोपत असलं तरी झोपत नसतं, जागत असताना झोपत असतं...

गणित असताना इतिहास असतं, इतिहास असताना गणित असत...

हसत असताना रडत असतं, रडत असताना हसत असतं...

चालत असताना चालत नसतं, बसलेलं असताना चालत असतं...

नाचत असताना शांत असतं, शांत असताना नाचत असतं...

बघताना पण ऐकत असतं, ऐकता ना पण बघत असतं...

उपवास असल्यावर खात असतं, खात असल्यावर उपवास असतं...

करायचं नसतं ते करत असतं, करायचं असतं ते करत नसतं...

राम असताना काम असतं, काम असताना राम असतं...

                                                                                सजगता एक वरदान

आपले दैनंदिन आयुष्य जगत असताना खरंच आपण ते सजग राहून जगत असतो का?
नेहमीच किती सहजपणे आपण जागरूक ( Alert ) रहा असं म्हणत असतो. परंतु प्रत्यक्षात खरंच तसे असतो का?
सजगता म्हणजे स्वतः प्रती जागरूक! आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक कृती, प्रत्येक विचारा प्रती सजग!
खरंतर सजगता भगवंताने आपल्याला आपल्या जन्मापासूनच प्रदान केली आहे.
मानवालाच नाही तर प्रत्येक पशु पक्षी यांच्याकडे ही सजगता आहे.
सोपे उदाहरण बघा - आपल्या अंगावर एखादी माशी किंवा डास बसला तर आपली त्वचा सजग होऊन विरोध करते.
एखाद्या गरम वस्तु चा स्पर्श झाला चटका बसला की प्रतिक्षिप्त क्रिया घडते.
रोजच्या जीवनात आपले डोळे, त्वचा, ह्दय, मेंदू हे अवयव सजगतेने काम करत असतात. त्
यामुळेच आपल्या मध्ये एक प्रकारचे चैतन्य अव्याहतपणे चालू असते. विचार करा आपले हे अवयव जर का सजगतेने काम करत नसते तर काय होऊ शकते?
सजग राहण्याचे दुसरे उदाहरण चोराचे -  चोरी करताना तो किती सजग असतो. सतत तो चोर कुणी येतं का? कुणी बघत तर नाही ना?  इकडे लक्ष देतो म्हणुन स्वतःला वाचवू शकतो.  किंवा एखाद्या वाॅचमन चे काम बघा - तो किती सजग (सतर्क) राहुन त्याचे काम करतो. त्यामुळेच वाईट लोकांना प्रतिबंध करु शकतो. पण तो जर का झोपला किंवा कशाही प्रकारे  त्याने दुर्लक्ष केले तर?
तसेच मनुष्याचे सुध्दा आहे - तो रोजच्या जीवनात कृती मध्ये सजग नाही राहिला की काही अघटीत घडते. आणि विचारांप्रती सजग नाही राहिला तर जीवन दुःखी, त्रासदायक होते.
आपल्या मधील षड्विकार (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) या प्रती सजग राहिला तर अनेक वाईट गोष्टी टाळू शकतो व प्रत्येक कृती चांगलीच होऊ शकते.
आपल्या विचारांप्रती सजग राहिले तर अनावश्यक विचारांची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते; पुनरावृत्ती तोडू शकतो.
भगवंताने ही सजगता आपल्याला आतुनच दिली आहे. म्हणूनच ह्दय, मेंदू, डोळे इत्यादी शारिरीक अवयव त्यांचे कार्य सजगतेने करतातच. परंतु आपले मन ते मात्र सजग नाही ठेऊ शकत आपण!
तुम्हाला हे माहित आहे का आपण सर्वच भीती पोटी नेहमीच किती सजग असतो.
उदा. एखाद्या कुत्रा दिसला तर तो मला चावेल का?  किंवा गाडी चालवताना माझा अपघात होईल का? अशा अनेक प्रकारच्या भीतीदायक गोष्टीं प्रती आपण जास्त सजग असतो. त्यामुळे आपल्या आत दुःखाच्या लहरीच जास्त तयार होतात. दुःखा प्रती जास्त सजग राहिल्यामुळे जीवनात दुःख जास्त व आनंदा प्रती कमी सजग त्यामुळे जीवनात आनंद कमी असतो.
ईश्वराने आपल्याला दिलेल्या या शक्तीला मन विरोध करते. मनुष्य चुकीच्या आत्मविश्वासावर ही सजगता विसरत चालला आहे.
आपण जेवण करत असताना थोडे जास्त खाल्ले तर आपल्याला लगेच त्याची जाणीव करून देते, ही शरिराची सजगताच आहे.
सजगतेच्या मिळालेल्या या ईश्र्वरी शक्ती मुळे अनेक अनाकलनीय गोष्टी निसर्गात सुध्दा घडत असतातच.
जसे चातक पक्षी पावसाच्या एका थेंबासाठी किती सजगतेने वाट बघत असतो; किंवा एखादे फुल (मोगरा, गुलाब) कळी असे पर्यंत गंध आत दडवुन ठेवते; परंतु एकदा का उमलले की गंधाची उधळण करतेच; पावसाचा पहिला थेंब मातीत पडला की मातीचा सुगंध दरवळतो; आणि माती मधील बीज त्या सजगतेने रुजु लागते. नवजात बाळाच्या जन्मानंतर आईला वात्सल्याने पान्हा फुटतोच ही निसर्गाची सजगताच नाही का?
ही सजगताच जर का आपण रोजच्या जीवनात आणली तर सगळ्या गोष्टी किती सुकर, सुलभ होऊ शकतात.
आपल्या जीवनात जर काही वाईट घडत असेल तर केवळ आपण सजगता विसरल्या मुळेच!
सजगता ही एक प्रकारची साधनाच आहे. तसेच आपल्या प्रेमगंध परिवारातील साधना- साक्षीभाव, स्वतःहुन श्र्वास घेणे, पुतळा  (statue) अवस्थेत बसणे किंवा त्राटक करताना पापणी सुध्दा न हलवणे या साधना म्हणजे सजगतेचे उत्तम उदाहरण आहे.
रोजच्या जीवनात किमान एक तास तरी आपल्याला असं पूर्ण सजग राहणे जमले पाहिजे.
रोजच्या साधना, भक्ती किंवा नामजप यामध्ये आपण किती सजग  आहोत हे पाहणे आवश्यक आहे.
ईश्वराची भक्ती करताना-सर्व काही विसरून त्याच्या प्रती पुर्ण समर्पण भाव आला पाहिजे. माझ्या प्रमाणे माझ्या भगवंताला ही भुक लागली असेल, तहान लागली असेल ही सजगता भक्ती मध्ये आली पाहिजे.
भक्ती करताना देहभान विसरून, ईश्वराप्रती आत्म्याची सजगता आल्याशिवाय ईश्र्वराचे व आत्म्याचे मिलन (जीव,शिवाचे) होणार नाही.
अध्यात्मा मध्ये ही सजगता अतिशय आवश्यक आहे, त्याशिवाय काहीच पुर्ण होऊ शकत नाही.
शास्त्रज्ञ, डॉक्टर हे ईश्र्वर मानत नाहीत, परंतु जे काही कार्य करतात ते पुर्ण सजगतेने करतात; तिथे ईश्र्वरी अंश दडलेला आहेच की! ईश्र्वराच्या इच्छे शिवाय काहीच घडत नाही. ईश्र्वराचे प्रत्येक कार्य सजगतेने अथकपणे चालू आहे. त्या ईश्वराने प्रत्येक माणसाला एक अलौकिक सुगंध देऊन पाठवले आहे. जो सुगंध दुसऱ्या कुणाशीही जुळत नाही.
आतापर्यंत मानवाने जे देव (मुर्ती) निर्माण केले त्यांचीच पुजा आपण करत आलो आहोत; परंतु  मानवाला ज्या ईश्वराने निर्माण केले; ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्या ईश्र्वराची प्रार्थना, पुजा कधी करणार आपण?
एखाद्या छोट्याश्या अंकुरा पासून अगणित रंग, रुप, गंध देणारा ईश्र्वर!  चैतन्य निर्माण करणारा तो ईश्र्वर!! त्याचे धन्यवाद कधी देणार त्या??!! त्या ईश्र्वराची प्रार्थना, पुजा आपण कधी करणार?
खऱ्याअर्थाने जेव्हा मानव सजग होऊन या ईश्र्वराची पुजा करेल तेव्हा मनुष्य जन्माचे सार्थक होईल.
हे माझे म्हणणे आहे, खरं की खोटं ते तुम्ही च पडताळून पाहु शकता.

                                                                                       अथांग का सिमित

आपला भगवंत, आपला ईश्वर मुठभर नाही तर तो अथांग आहे. तो कणाकणात आहे, तो सर्वत्र आहे.
भगवंताला एखाद्या मुर्ती पुरता किंवा मंदिरा पुरता मर्यादित का करुन ठेवायचे?
भगवंत तर प्रत्येक माणसात आहे; सर्वांच्या मनात पण आहे. तो सतत माझ्या सोबतच आहे, एकदा का ही जाणीव झाली की प्रत्येक कार्य चांगलेच होते. आपल्या प्रत्येक चांगल्या कार्यात पण तो असतोच की! आपल्या दृष्टीत, ऐकण्यात, बोलण्यात, प्रत्येक कॄती मध्ये त्याचे अस्तित्व सतत असते.
आपल्या सर्व कार्यात त्याला पाहणे योग्य नाही का?
भगवंताचे स्मरण ठेवून, प्रत्येक कार्य त्याचेच आहे, हे जाणीव पुर्वक करणे ही पण एक प्रकारची साधनाच आहे.
ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकत राहण्यापेक्षा सेवाभावी वृत्तीने, निष्काम, निस्वार्थ कार्य करत राहावे. तसेच जो माझ्यात आहे तोच इतरां मध्ये पण आहे याची जाणीव सतत ठेवल्याने आपल्या मधील त्या अथांगाचं दर्शन अंतर आत्मातुन होऊ लागते. आणि त्यानंतर बाह्य भटकंती हळूहळू कमी होऊन जाते. आपण मौन होऊ लागतो!

माझा आनंद बाहेर नाही तर माझ्यातच आहे याची जाणीव एकदा का झाली की बाहेरची भटकंती, शोध थांबतो. आपल्या मधील ईश्वरी तत्त्व आपोआप प्रकट होऊ लागते!!
परमात्म्याला बाहेर शोधण्यासाठी आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्या शक्तीचा उपयोग आपल्यातील दुर्गुण घालवण्यासाठी केला तर, परमात्म्याचे दर्शन होऊ लागते.
अथांग अशा या भगवंताला आपण फक्त मुर्ती मध्ये किंवा मंदिरा मध्ये शोधणे म्हणजे समुद्राच्या पाण्याला एखाद्या घागरी मध्ये भरण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्या लहान मुलाने अंगणात येऊन पूर्ण आकाश आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करण्या सारखेच आहे !
रोजच्या जीवनात असंच काहीसं आपण करत आहोत असं नाही का वाटत?
माझ्या बोलण्याचा विपरित अर्थ काढुन चर्चा करण्यापेक्षा चिंतन, मनन व्हावे ही अपेक्षा!
मी म्हणतच नाही माझेच म्हणणे खरं आहे पण विचार केला तर नक्की कळेल काय खरं आहे आणि काय खोटं!
पोस्ट आवडली नाही तर वाचुन सोडून द्या

bottom of page