top of page

Gurudev Shri Manoj ji Jain (गुरुदेव श्री मनोज जी जैन)

गुरूवर्य मनोजजी जैन यांच्यावर अगदी लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. संसाराचा गाडा ओढत असताना आलेल्या नैराश्यातून ते अध्यात्माकडे वळले. भक्ती मार्गाने सुरुवात करून‚ जवळ जवळ 15 वर्षे खडतर साधना करून आत्मज्ञान प्राप्त केले व ध्यानाच्या अती उच्च अवस्थे पर्यंत पोहोचले. आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा म्हणून त्यांनी आशीर्वाद फाऊंडेशन नावाची संस्था सुरू केली. या संस्थेअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम घेतले.

साधनेतून सिद्‌धी प्राप्त झाल्यामुळे अनेक लोक अडचणी घेऊन त्यांच्या कडे येत. ते सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागत व अडचणी सोडवत. काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की लोकांच्या अडचणी संपतच नाहीत. एक संपली की दूसरी हजर. त्यांनी ठरवलं की लोकांनाच सक्षम बनवायचं. आपल्याला जे मिळालय ते लोकांना द्यायचं. यासाठी त्यांनी ध्यान वर्ग सुरू केला. यात त्यांनी स्वत: शोधलेल्या श्वासाच्या साधना घ्यायला सुरुवात केली. अडचणी विचारायला येणारे, साधनेला येऊ लागले. हळु हळु अडचणी विसरून फक्त साधनेला येऊ लागले. साधने मुळे लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, अडचणी दूर होऊ लागल्या.

 

यातूनच प्रेमगंध ध्यान साधना परिवाराची स्थापना झाली. अवघ्या एक वर्षाच्या आत गुरूदेवांनी अनेक साधकांकडून साधना करून घेऊन त्यांना तयार केले. मॉं विदेही‚ माँ प्रमोदिनी, माँ अन्नपूर्णा, माँ प्रेमा, माँ गीता यांना गुरूकृपेने उच्च अवस्था प्राप्त झाली.

गुरूदेवांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व प्रेमळ आहे, याचा अनुभव त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येतो. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे असंख्य लोक त्यांचे भक्त झाले आहेत. परंतू गुरूदेव नेहमी म्हणतात, की मी तूमचा गुरू नाही मित्र आहे. ध्यान साधने मुळे व्यक्तीमत्वात किती सकारात्मक बदल होतो हे गुरूदेवांनी स्वत: अनुभवलं व अनेक शिष्यांना अनुभूती दिली. म्हणून प्रेमगंध ध्यान साधनेचं महत्त्व जाणून सर्वांनी प्रेमगंध ध्यान साधना करावी असा गुरूदेवांचा आग्रह असतो.

Gurudev.jpg

Maa Videhi (माँ विदेही)

गुरू सदैव आपल्या सर्व शिष्यांना भरभरून ज्ञान देतात. गुरूंच्या आशीर्वादा ची  सदैव बरसात होत असते. फक्त तो आशीर्वाद घेण्यासाठी शिष्याला योग्य रीतीने झुकता आले पाहिजे.
आपल्या सर्व शिष्यांची स्वतःपेक्षाही प्रगती व्हावी  अशीच गुरुंची अपेक्षा असते. या साठी गुरू सदैव प्रयत्नशील असतातच.
आपले प.पू.गुरुदेव तर प्रेमगंध च्या सर्व साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी याकडे अतिशय बारकाईने लक्ष देतात.
परंतू शिष्यानेही तेवढ्याच समर्पणाने सर्व आत्मसात केले पाहिजे. गुरुंनी एखादी गोष्ट करायला सांगितली की मनातही त्या बद्दल किंतू परंतु न येता त्यावर जेव्हा शिष्याकडून कृती होते तेव्हाच खरे समर्पण घडते.
गुरुंच्या हृदयात सर्व साधकांसाठी स्थान असतेच...फक्त आपला अहंकार, मी पणा सोडून; स्वतःला विसरून शिष्याला तिथे जाता आलं पाहिजे. तरच सर्वार्थाने शिष्याची प्रगती होते. आणि असाच शिष्य गुरूंना पूर्ण समाधान मिळवून देतो.

19 ऑगस्ट 2017 या दिवशी एका साधिकेचा  आध्यात्मिक दृष्ट्या पुनर्जन्म झाला आणि उत्तम शिष्या लाभल्याचे समाधान गुरुदेवांना मिळाले. संसारात राहूनही सर्वांपासून मुक्त अगदी स्वतः च्या देहापासूनही!! देहभान विसरून, स्वतः ला विसरून त्या गुरुदेवांनी दिलेल्या ध्यानसाधना मार्गात वाटचाल करत होत्या. म्हणूनच गुरुदेवांनी त्यांचे नामकरण केले विदेही आणि त्याच प्रेमगंध च्या माँ विदेहीजी झाल्या.
  माँ नी स्वतःचा संसार सांभाळून साधना मार्गात उच्च प्रगती साधली आहे. अनेक उत्तमोत्तम साधनाही विकसित करत आहेत. प. पू. गुरुदेवांचे कार्य सर्वापर्यंत नेण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. झटून काम करत आहेत.
  साधना करत असतानाच गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने माँ नी अनेक व्याधींवर नैसर्गिक वनौषधी ही शोधल्या आहेत. या औषधी प्रेमगंध ध्यान साधना शिबिरात साधकांना दिल्या जातात. ध्यानसाधना व या वनौषधीं नी अनेक साधकांना भरपूर फायदा झाला आहे. अनेक जण तीन दिवसात व्यसनमुक्त ही झाले आहेत.
  या त्यांच्या सेवा कार्यासाठी गुरुदेवांनी प्रेमगंध चा चेहरा असे संबोधून माँ विदेहीजीं ना गौरविले आहे.
सर्व साधकांना प्रेमाने सांभाळून घेऊन, त्यांची साधनेत प्रगती व्हावी म्हणून त्या सतत प्रयत्नशील असतात. प्रेमगंध परिवार हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे!!
माँ चा तेजस्वी चेहरा पाहिला की प्रत्येक साधकाला अतिशय समाधान मिळते. माँ चे हास्य साधकांना उत्साह मिळवून देते. माँ चा आवाज साधकांना मंत्रमुग्ध करतो.
  त्यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीत माँ नी प्रेमगंध चे विचार मांडलेत. त्यांनी लिहिलेले लेख साधकाला योग्य मार्ग दाखवतात. साधनेत प्रगती साधता यावी, दैनंदिन साधनेत साधकांचे  सातत्य राहावे म्हणून त्या सतत प्रयत्नशील असतात. साधकांना मार्गदर्शन करत असतात.


                                                           प्रेमगंध चा असे गंध हा
                                                          समर्पणाची असे प्रचिती
                                                       उद्दिष्ट असे प्रेमगंधची प्रगती
                                                       हिच माँ विदेहीजींची महती

Maa Videhi.jpg
bottom of page